नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी शरद खंडेराव पवार यांची निवड जाहीर

नगर (प्रतिनिधी) दि १ मार्च – आज राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष श्री.रोहिदास पाटील कर्डिले यांची व श्रीगोंदा – नगर विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती श्री.शरद खंडेराव पवार यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, किसनराव लोटके, अंबादास गारुडकर, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, बाळासाहेब जगताप, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी फाळके म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून पक्ष संघटना मजबूत करावी.पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री मा.ना.श्री.जयंतराव पाटील साहेब, व मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शनानुसार सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे.
श्री.रोहिदास पाटील कर्डिले व श्री.शरद पवार हे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनुभवी असल्याने याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निश्चितच होईल, असा मला विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.
श्री.कर्डिले म्हणाले, आगामी काळात होऊ घातलेल्या बाजार समिती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नामदार प्राजक्तदादा तनपुरे, आ.निलेश लंके, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार व माजी आमदार राहुल जगताप यांचे नेतृत्वाखाली जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून नगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी करणार असून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना विचारात घेऊन काम करणार असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले.