अनेकदा रक्तदान करून इतरांना जीवदान देणारे रक्तदाते व सैन्यदलाती सेवानिवृत्त सैनिक सिताराम सदाशिव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन!

शिर्डी: दि. 22 डिसेंबर (प्रतिनिधी: हेमंत शेजवळ)
नाशिक जवळील भगूर येथील एअर फोर्स मधील सेवानिवृत्त कर्मचारी व रक्तदाते सिताराम सदाशिव जाधव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 76 वर्षाचे होते.त्यांच्या मागे पत्नी,चार मुली,एक मुलगा,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.शिर्डीतील पत्रकार हेमंत शेजवळ,व मुंबई येथिल बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ ढाले, गौतम ढाले तसेच मेडीकल क्षेत्रातील प्रशांत निरभवणे यांचे ते सासरे होते,तसेच
नाशिक भगूर येथील नेहमी हासमुख व शांतिप्रिय सर्वांचे चहाते असलेले कपिल सिताराम जाधव यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा जलदानविधी रविवार 24 डिसेंबर 2023 रोजी भगूर येथे होणार आहे.
कै,सिताराम सदाशिव जाधव हे भारतीय सैन्य दलात ते काही दशक सेवा देऊन ते भारतीय वायु सेनादलात सामिल झाले.त्यांनी भारतीय वायु सेनादलामध्ये नोकरी केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते.देश सेवा करत असताना एक सामाजिक बांधिलकीतून त्यांनी सुमारे एकशे पाच वेळेस रक्तदान केले.रक्तदान करून अनेकांना त्यांनी जीवदान दिले.भारतीय वायु सेनादलातमध्ये नोकरी करत असताना देश सेवा करण्याबरोबरच रक्तदान करून समाजसेवा करण्याची त्यांची सारखी धडपड असायची, रक्तदानाबरोबरच इतर सामाजिक उपक्रमातही ते नेहमी सक्रिय सहभागी असायचे,कोणताही सार्वजनिक सण उत्सव असो त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.गणेश उत्सव नवरात्र उत्सव असो बुद्ध जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो या सर्व कार्यक्रमात ते हिरारीने सहभागी होत आसत व!आप आपल्या परीने या कार्यक्रमांना मदत करणार,आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या तरुणांना देश सेवा,समाजसेवेचे नेहमी विविध उदाहरणे देत मार्गदर्शन ते करत असत.व्यसन करू नका,शरीर ही माणसाची संपदा आहे,तरुणांनी ती संपदा टिकवली असे ते नेहमी म्हणत.आपल्या परिसरात कोणालाही अडीअडचणी आल्यास,कोणतीही समस्या उद्भवल्यास तेथे जाऊन आपापल्या परीने मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता.त्यामुळेच ते एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. शांत सुस्वभावी व सर्वांशी मिळून मिसळून वागणारा त्यांचा स्वभाव होता.त्यांचे सर्व क्षेत्रातील ज्ञान सामाज सेवा व देश सेवेबद्दल त्यांना मोठा अभिमान, स्वाभिमान होता.सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे समाजसेवेचे व्रत त्यांनी सोडले नाही.त्यांनी अनेक वेळेस रक्तदान केले. सर्वात श्रेष्ठ रक्तदान समजले जाते.हे ओळखून त्यांनी सुमारे 105 वेळेस रक्तदान केले. रक्तदान करताना फक्त समाजसेवा,रुग्णांना जीवदान मिळेल हीच अपेक्षा ठेवली. अनेकांना जीवदान दिले.समाजकार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेतला म्हणून व देश सेवा करत असताना अनेकदा त्यांनी आपली प्रामाणिक इमानदारीने सेवा करत चांगले कार्य केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,सिने अभिनेत्री अलका कोबल, निशगंधा वाड,माजी खासदार कवाडे साहेब,त्याचप्रमाणे केंद्रातील,राज्यातील अनेक मंत्री खासदार,आमदार यांनी त्यांचा वेळोवेळी सत्कार,सन्मान केलेला होता.असे दिलखुलास व शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. मात्र त्यांची कर्तव्याची,त्यांच्या समाजकार्याची आठवण ही कायम राहणार आहे.