शिर्डी येथील एटीसी टॉवर कंपनीच्या 24 बॅट-या चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद

अहमदनगर दि. 16 डिसेंबर (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी
अमोल बाबासाहेब वर्पे वय 27, रा. खंडाळा, ता. श्रीरामपुर यांच्या एटीसी टॉवर कंपनीच्या 39,000/- रुपये किंमतीच्या 24 बॅट-या दिनांक 15/12/23 रोजी अनोळखी इसमांनी चोरु नेले बाबत शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. 1101/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी गुन्हा उघडकीस आणणे करीता विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ/बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, सचिन आडबल, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/भाऊसाहेब काळे व मेघराज काळे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक दिनांक 16/12/23 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा सुखदेव खिळदकर रा. आष्टी, जिल्हा बीड याने केला असुन तो चोरी केलेल्या बॅट-या विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने लागलीच चांदणी चौक, अहमदनगर येथे जावुन बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सुखदेव रामदास खिळदकर वय 30, रा. नांदुर विठ्ठलाचे, ता. आष्टी, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे आजिनाथ पवार रा. राहुरी याचेसह केल्याची कबुली देवुन गुन्ह्यात चोरी केलेल्या 39000/- रुपये किंमतीच्या एटीसी कंपनीच्या 24 बॅट-या काढुन दिल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.