सामाजिक
पीपल्स रिपब्लिकन पार्टी महिला आघाडीच्या वतीने संविधान दिन साजरा!

अहमदनगर दि.२६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टी महिला आघाडीच्या वतीने २६ नोव्हेंबर अर्थात संविधान दिन मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मार्केटयार्ड येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रीसरण पंचशील घेत आभिवादन करण्यात आले.यावेळी संविधानाच्या उद्धेशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संपादक महेश भोसले,उप संपादक सुरेश भिंगारदिवे,सामजिक कार्यकर्ते संजय ताकवले ,पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,हिरा भिंगारदिवे,रंजना भिंगारदिवे,सुनिता भिंगारदिवे,रेखा साळवे,मंगल साळवे,सारिका गायकवाड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.