संवेदनशील अभिनेता काळाच्या पडद्याआड – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डी दि.२६ विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील भारदस्त आणि सामाजिक भान असलेला संवेदनशील अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी म्हणाले की, विक्रम गोखले यांना अभिनयाचा चार पिढ्यांचा समृध्द असा वारसा मिळाला होता. रंगभूमीवरील कलेची परंपरा जोपासताना लेखन, वाचन आणि दिग्दर्शन क्षेत्रातील आपली आवड त्यांनी जोपासली. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी अधिराज्य निर्माण केले होते. एक संवेदनशील, स्पष्टवक्तेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता.
मराठी किंवा हिंदी भाषेतील कोणत्याही चित्रपटात संवाद फेकण्याची विक्रम गोखले यांची हातोटी अतिशय वेगळी होती. भाषेवरील प्रभुत्व त्यांच्या अभिनयाचे एक वेगळेपण ठरल्याचे श्री. विखे – पाटील म्हणाले.