कर्जत येथील सर्व वसतिगृहाच्या वतीने संविधान सन्मान रॅली संपन्न

कर्जत दि.२६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) कर्जत येथे सर्व वसतिगृहाच्या वतीने संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.
सकाळी 8 वा छत्रपती शिवाजी चौकातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आलायावेळी सभेच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार गणेश जेवरे होते ,यांनी अध्यक्षीय भाषणात संविधान प्रस्ताविकाचे वाचन करून आपले संविधान जगात सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे, आपल्या देशात अनेक जाती धर्म पंथ असूनही सर्व समावेशक सर्वश्रेष्ठ संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांवर प्राणीमात्रांवर फार मोठे उपकार केलेले आहेत असे महत्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीग्रह , मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीग्रह, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीग्रह, संत गाडगेबाबा मुलींचे वस्तीग्रह, महात्मा गांधी विद्यार्थी वस्तीग्रह, तसेच सिद्धार्थ विद्यार्थी वस्तीग्रह अशा या सर्व वस्तीगृहातील मुलांचा आणि मुलींचा या संविधान सन्मान रॅली मध्ये समावेश होता. संविधान सन्मान रॅलीमध्ये संपूर्ण कर्जत शहरात विद्यार्थ्यांच्या आवाजामध्ये संविधानाच्या सन्मानात घोषणाबाजी करण्यात आली. या निमित्ताने सहा डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार गणेश देवरे यांच्यासह मच्छिंद्र अनारसे सुभाष माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सबीना कुरेशी मॅडम, डि बी गवळी सर, प्रमोद भैलुमे सर, रामदास पेटकर सर, नेमाने एस वाय, सोमनाथ भैलुमे सर, लालासाहेब वाघमारे सर, यांच्यासह इतर सर्व वस्तीग्रह कर्मचाऱ्यांचा या संविधान सन्मान रॅलीमध्ये समावेश होता.
अधीक्षक शरद कांबळे सर यांनी प्रास्ताविक केले तर अधीक्षक रामदास पेटकर सर यांनी या सन्मान रॅलीमध्ये आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.