अपघाताचा बनाव करुन, प्रवाशांची फसवणुक करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

अहमदनगर दि. 25 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी अशोक बप्पासाहेब जाधव वय 23, रा. वांजरावस्ती, लोणी घाट, ता. जिल्हा बीड व त्यांचे मित्र जलभवन पाटबंधारे विभाग, तारकपुर समोर कारमधुन जाताना एक अनोळखी इसम पाठीमागुन विना नंबर मोटार सायकलवर येवुन कार थांबवुन तुमच्या गाडीच्या कटमुळे मी पडलो, तुम्ही माझा दवाखान्याचा खर्च करा असे म्हणुन फिर्यादी जवळी 30,000/- रुपये रोख, आधारकार्ड व लाईसन्स स्वत:कडे घेवुन विश्वासघात करुन पळुन गेला बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1642/2023 भादविक 406 प्रमाणे दिनांक 20/11/2023 रोजी विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, गणेश भिंगारदे व पोकॉ/रणजीत जाधव अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक घटना ठिकाण व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तसेच यापुर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणारे व सध्या जामिनावर बाहेर असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 23/11/23 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा पोपट नरवडे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी याने केला असुन तो त्यांचे गांवी आला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने लागलीच मोमीन आखाडा, ता. राहुरी येथे जावुन संशयीत आरोपी नामे पोपट नरवडे याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) पोपट लक्ष्मण नरवडे वय 45, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील 15,100/- रुपये रोख काढुन दिल्याने त्यास मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी पोपट लक्ष्मण नरवडे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात राहुरी, आश्वी, नेवासा, लोणी व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी व विश्वासघाताचे एकुण – 09 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. राहुरी 73/2014 भादविक 392, 34
2. राहुरी 95/2014 भादविक 392, 34
3. राहुरी 141/2014 भादविक 392, 34
4. राहुरी 143/2014 भादविक 392, 34
5. आश्वी 129/2020 भादविक 394
6. नेवासा 209/2020 भादविक 394, 201
7. लोणी 310/2020 भादविक 392
8. लोणी 733/2020 भादविक 392, 323
9. श्रीरामपूर शहर 1791/2020 भादविक 341, 406, 406
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.