महाराष्ट्र राज्यात वाहतुक व विक्रीस बंदी असलेले गोवंशीय जातीचे 150 किलो गोमास व स्विफ्टकार असा एकुण 4,22,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थागुशाचे पोना/सचिन आडबल, संतोष खैरे, भिमराज खर्से व आकाश काळे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन रवाना केले.
पथक अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 13/11/2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम गोमास विक्री करण्यासाठी पांढरे रंगाचे स्विफ्ट कारमधुन, अहमदनगर येथील पत्रकार चौक ते तारकपुर जाणारे रोडणे येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी पत्रकार चौक ते तारकपुर जाणारे रोडवर सापळा लावुन थांबलेले असताना एक संशयीत पांढरे रंगाची स्विफ्ट कार येताना दिसली. पथकाची खात्री होताच वाहन चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता त्याने वाहन थांबविले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन, त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अरबाज मेहमुद कुरेशी वय 22, रा. कुरेशी मोहल्ला, ता. श्रीरामपूर असे सांगितले. त्याचे ताब्यातील स्विफ्ट कारची पहाणी करता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेले गोमास असल्याची खात्री होताच कार चालकास ताब्यात घेतले. त्याचेकडे गोमास बाबत विचारपुस करता त्याने गोमास हे 2) वश्या ऊर्फ जाकिर रेहमान शेख रा. ममदापुर (फरार) याचे मालकीचे असुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असले बाबत सांगितले. ताब्यातील आरोपीचे कब्जातुन 22,500/- रुपये किंमतीचे 150 किलो गोमास व 4,00,000/- रुपये किंमतीचे पांढरे रंगाची स्विफ्टकार असा एकुण 4,22,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोकॉ/93 आकाश राजेंद्र काळे ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर याचे फिर्यादी वरुन तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 1622/23 भादवी कलम 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे (सुधारणा) 2015 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.