ॐ चैतन्य प. पु. लालगीरी स्वामींच्या पावनभूमीत श्री संत बाळूमामा मंदिरातील सेवेकऱ्यांच्या हस्ते दीपोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

अहमदनगर दि.13 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
शुक्रवार दि.१० नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र मांदळी येथे दीपोत्सव सोहळा सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजता
कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील श्री संत बाळूमामा मंदिरातील सेवेकऱ्यांच्या हस्ते मोठ्या उत्सवात संपन्न झाला.
यावेळी ॐ चैतन्य प. पु. लालगीरी स्वामींच्या पावनभूमीत ॐ चैतन्य श्री आत्माराम गिरीबाबांच्या कृपाशिर्वादाने व प. पू. सुदामनाथ बापुंच्या प्रेरणेने श्री ह.प.भ. सोमनाथ महाराज बारगळ यांच्या मार्गदर्शनाने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे चार दिवसांचे पारायण मांदळी या ठिकाणी करण्यात आले.
दीपोत्सव सोहळ्याचा प्रारंभ अश्विन कृ. १० बुधवार दि. ०८/११/२०२३ रोजी होऊन सांगता १०/११/२०२३ रोजी विवीध कार्यक्रमांनी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ ते १० प्रवचन सेवा होऊन शिवसंगम ज्ञानयज्ञ कमिटी मार्फत होमहवन विधी सायंकाळी ५ ते ६ यावेळी संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ भस्म वाटी देऊन सन्मान करण्यात आला. तद्नंतर सुश्राव्य अश्या हरी नामाच्या भजनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाचा समाप्ती करण्यात आली. याप्रसंगी परिसरातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.