संगमनेर जेलमधून पहाटे चार कैदी फरार

अहमदनगर दि.8 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी संगमनेर जेलमधून पहाटे चार कैदी फरार झाल्याची माहीत समोर आली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच असणाऱ्या जेलमधील चार आरोपींनी जेलचे गज तोडून पलायन केल्याची घटना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जेलमधील कैदी पळून गेल्याने पोलिसांची पळापळ झाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून कैदी पळाल्याने संगमनेर जेल प्रशासनाची इज्जत पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच उपकारागृह बांधण्यात आलेले आहे. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या जेलमध्ये ठेवलेले असतात. या कारागृहामध्ये कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आधी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने संगमनेरचे कारागृह नेहमी चर्चेचा विषय असते. जेलच्या बंदोबस्तावर असणारे पोलीस व कैदी यांच्यात होणारे वाद विवाद यामुळे हे कारागृह वादग्रस्त ठरले आहे.
संगमनेच्या कारागृह सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यासाठी ठरले. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला.