
शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली असून या महाराष्ट्र राज्य ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नगर शहरातील पत्रकार महेश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सचिव पदी बाळकृष्ण भोसले व प्रमुख सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय अध्यक्ष शरदराव तांबे पा.यांनी तसे नियुक्तीचे पत्र त्यांना दिले आहे. अहमदनगर येथे नुकतीच नाशिक विभागीय अध्यक्ष शरदराव तांबे पा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन ही अहमदनगर जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पत्रकारांच्या विविध समस्या, ग्रामीण भागातील युवा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महेश भोसले हे नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पत्रकार बाळकृष्ण भोसले हे प्रदीर्घकाळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिकध्वज, राहुरी यांनी विविध वृत्तपत्रात आतापर्यंत मोठी जबाबदारी सांभाळत जिल्ह्यात पत्रकारांचे मोठे जाळे तयार केले आहे .त्यांचीही या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे. नगर शहर अध्यक्षपदी पत्रकार अशोक तांबे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरदराव तांबे पा. यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले असून यापुढे भविष्यात युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी अहमदनगर जिल्हा कार्यकारणी अधिकाधिक प्रयत्न करील व त्यासाठी आपणास शुभेच्छा आहे. असे या पत्रात म्हटले असून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व क्षेत्रामधून व युवा ग्रामीण पत्रकारांमधूनही अभिनंदन होत आहे.