राजकिय

शिवराष्ट्र सेनेच्या मंगल बरकडे यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश! अहिल्यानगर शहर सचिवपदी निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 18 नोव्हेंबर : शिवराष्ट्र सेनेच्या मंगल बरकडे यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार त्यांची रिपब्लिकन सेनेच्या अहिल्यानगर महिला शहर सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, जिल्हा संघटक संजय ताकवले, महिला जिल्हा संघटक बेबीताई टकले, शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, वैशाली निमसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे