रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले ११ व १२ मार्च रोजी अहमदनगर दौऱ्यावर

अहमदनगर (प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत समवेत राज्य उपाध्यक्ष/अहमदनगर संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे.
शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी शिर्डी येथे शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
शनिवार दि.१२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वा प्रवरा लोणी येथे खासदार सुजय विखे यांच्या समवेत शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १वा.अहमदनगर शहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद.दुपारी २वा स्वास्तिक चौक येथील अहमदनगर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी २.१५ वा दिवंगत युवक जिल्हाध्यक्ष अशोक जगन्नाथ केदारे यांच्या कुटुंबाची निंबोडी येथे सांत्वनपर भेट व दिवंगत अशोक केदारे यांच्या स्मरनार्थ बांधलेल्या कमानीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते होणार आहे. दु ३वा.करमळा मार्गे इंदापुरला जाणार आहेत.अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.