सामाजिक
चांदे खुर्द मध्ये तुफान पाऊस पिकांचे नुकसान बळीराजा चिंतेत!

चांदे खुर्द (प्रतिनिधी)कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द गावामध्ये ६ आणि ७ऑक्टोबर रोजी चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदे खुर्द मध्ये नदी नाले तळी तुडुंब भरून वाहत आहेत. यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतेत आहे शेतकऱ्याचे पीक मका,तूर,उडीद,बाजरी अशा पिकांचे नुकसान पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी आर्थिक व हालाकीच्या परस्थितीत व संकटात सापडलेला आहे. शेतकरी वर्गातून सरकारकडून पंचनामा करून फुल ना फुलाची पाकळी मदत शेतकऱ्यांना मिळावी असे अपेक्षा शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.