विविध मागण्यांसाठी १० मे रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(आठवले) गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने

अहमदनगर ( प्रतिनिधी):-केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली रिपाई (आठवले) पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर १० मे रोजी तिव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
प्रमुख मागण्या
■औरंगाबाद येथील मातंग युवक मनोज आव्हाड यांचा अमानुषपणे खुन करण्यात आला त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
■दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.
■मागासवर्गीय भुमीहिन शेत-मजुरांना ५ एकर गायरान जमीन देण्यात यावी.
■महात्मा फुले विकास महामंडळाच्या N F D C ४ व ५ लाख रुपयांचे कर्जपुरवठा तात्काळ करण्यात यावा.
■महात्मा फुले विकास महामंडळ,अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,चर्मोद्योग विकास महामंडळ व सर्व महामंडळा मार्फत कर्ज पुरवठा करण्यात यावा.
■मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप मध्ये वाढ करावी व वेळेवर देण्यात यावी मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वस्तीगृहांना अनुदानात वाढ करण्यात यावी.
■ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
■मशिदी वरील भोंग्यांना अजान साठी रितसर परवानगी देण्यात यावी व भोंग्या वरुन दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
वरील सर्व मागण्यांसाठी अहमदनगर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मंगळवार दि.१० मे २०२२रोजी सकाळी ११ वा.तीव्र निदर्शने करणार आहेत. आंदोलनासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नेते रिपब्लिकन पक्षाची जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष युवक आघाडी,महीला आघाडी,मराठा आघाडी,मुस्लीम आघाडी,मातंग आघाडी,आदिवासी पारधी आघाडी,रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ,जेष्ठ नेते गौतम घोडके,विलास साठे,संजय कांबळे,उत्तर महाराष्ट्र राज्य सचिव अजय साळवे,महिला जिल्हाध्यक्ष आरती ताई बडेकर,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,नगरसेवक राहुल कांबळे,मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष महेंद्र झिंजाडे,शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन,युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,नगर तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे,भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे,महिला नगर तालुकाध्यक्ष कविताताई नेटके,युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे,महादेव भिंगारदिवे,अमित जाधव,विशाल कदम,सुरज भिंगारदिवे,दत्ता कदम,शाम भोसले,पार्वती भोसले,संजय भैलुमे,अविनाश उमाप,संदेश पाटोळे,दिपक पाडळे,आकाश आरु,राजा जगताप,विशाल घोडके,गोरख सुर्यवंशी,यशराज शिंदे,अजय आंग्रे,विलास साळवे,बाबा राजगुरु,बाळासाहेब शिंदे,विजय बोरुडे,भाऊ वाघमारे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लोकेश बर्वे यांनी दिली.