
अहमदनगर दि.११ मार्च ( प्रतिनिधी) मोटारसायकल चोरणाऱ्या चोरांना गजाआड करण्यात तोफखाना पोलिसांना यश मिळाले आहे.या बाबतची हकीगत अशी की दि.३/३/२०२२ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.l १५३/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल झालेला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरता चोरी केली होती. त्यावरून फिर्यादी यांच्या सांगणे प्रमाणे फिर्याद नोंदविण्यात आलेली होती.दि.९/३/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अनिल कातकडे, तोफखाना पोलीस निरीक्षक सौ.ज्योती गडकरी यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. समाधान सोळंके व गुन्हेशोध पथकाचे अमंलदार कर्मचारी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाईप लाईन रोड येथून चोरीस गेलेली मोटरसायकल ही विकास खरपुडे रा. बुरुडगाव रोड चौरै मळा श्रीराम नगर याने चोरलेली आहे अशी माहिती मिळताच सदर इसमाच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने दि.३/३/२०२२ रोजी देवकीनंदन आपार्टमेंट पाईपलाईन रोड येथून सिल्वर रंगाची एक्सेस १२५ cc मोटरसायकल सुरू केली असल्याची कबुली दिली आहे सदरील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून ७ मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक सौ.ज्योती गडकरी,पो.उप.नि. समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोहेकॉ. दत्तात्रय जपे,पोना. अविनाश वाकचौरे,पोना. वसीम पठाण,पोना.अहमद इनामदार,पोना. शैलेश गोमसाळे,पोकॉ. शिरीष तरटे,पोकॉ. सतीश त्रिभुवन,पोकॉ. सचिन जगताप,पोकॉ. धीरज खंडागळे, यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. शकील हे सय्यद करीत आहेत