3 वर्षापुर्वी घडलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भिंगार कॅम्प पोलीसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर दि. १२ सप्टेंबर (प्रतिनिधी) 3 वर्षापुर्वी घडलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भिंगार कॅम्प पोलीसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात मिळाली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी सर्व पोलीस स्टेशन च्या प्रभारी अधिकारी यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करतांना मिळुन आल्यास कारवाई करणबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशाप्रमाणे सपोनि / दिनकर मुंडे कॅम्प पोलीस स्टेशन यांस गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोतवाली पोस्टे गुरनं 6272/2020 भादविक 397 मधील फरार आरोपी नामे १. तारा उर्फ संदीप जगन पाटोळे वय 39 रा. गौतमनगर, नागरदेवळे, भिंगार ता.जि. अहमदनगर हा त्याचे राहते घरी येणार असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सपोनि / डी. एस. मुंडे यांनी लागलीच तपास पथकातील पोसई/किरण साळुंके, सफी/ कैलास सोनार, पोहेकॉ संदीप घोडके, पोहेकॉ / रेवनाथ दहिफळे, पोना/ दिलीप शिंदे, पोकॉ अमोल आव्हाड असे पोलीस स्टेशनला बोलावून फरार आरोपीची माहिती व पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने तपास पथकातील अंमलदार यांनी फरार आरोपीचा शोध घेणे कामी लागलीच त्याच्या घरी जावुन माहिती घेतली असता सदर आरोपी हा त्याच्या घरी मिळुन आला तेव्हा तो पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्याचा शिताफिने पाठलाग करुन तपास पथकाने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव संदीप जनग पाटोळे वय 39 रा. गौतमनगर नागरदेवळे भिंगार ता.जि. अहमदनगर असे सांगितल्याने त्यास पथकाने ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 6272/2020 भादविक 397 अन्वये पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे, पोसई/किरण एस. साळुंके सफी / कैलास सोनार, पोहेकॉ / संदिप घोडके, पोहेकॉ /रेवननाथ दहीफळे, पोहेकॉ / आर.डोळे, पोना/दिलीप शिंदे, पोकों/ अमोल आव्हाड यांनी सदरची कारवाई केली आहे