सामाजिक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलच्या वतीने निवेदन

- श्रीगोंदा दि. 20 जानेवारी (प्रतिनिधी)
श्रीगोंदा येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी निवेदन दिले आहे .
या निवेदनात खालील विषय मांडण्यात आलेले आहेत . स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत , नगरपालिका महानगरपालिका , नगरपरिषद , पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा एक स्वीकृत सदस्य घेण्यात यावा .
संजय गांधी निराधार योजनेवरती दिव्यांगा चा हक्काचा प्रतिनीधी असावा . तसेच संजय गांधी योजनेचे दर महिन्याला येणारे मानधन एक ते सात तारखेच्या आत त्वरित दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे .
तसेच ते मानधन पंधराशे रुपये वरून तीन हजार रुपये करण्यात यावे .
अहमदनगर महापालिकेचा दिव्यांगांचा निर्वाह भत्ता त्वरित मेळावा .
पुणे जिल्हा परिषदेच्या धरतीवरती अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांना आर्थिक लाभ देण्यात यावा . तो वस्तु ऐवजी रोख स्वरूपात वार्षिक बजेट मध्ये त्याचा सामावेश करण्यात यावा .
तसेच ग्रामीण व शहरी दिव्यांगाना विनाअट घरकुल देण्यात यावे .अशा प्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अजित दादा म्हणाले की या सर्व मागण्यांचा मी अभ्यास करून त्वरित योग्य त्या निर्णय घेण्यात येईल . असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले .यावेळी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिजीत खोसे , अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत दादा गायकवाड , पारनेर नगर विधानसभा आमदार निलेश लंके , दौड चे माजी आमदार रमेशबापू थोरात , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल चे उपाध्यक्ष बाबासाहेब शेख , खजिनदार चंद्रकांत वाघमारे , सचिव शेखर बोत्रे आदी उपस्थित होते .