खते बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ देऊ नका : संतोष वाडेकर भूमिपुत्र शेतकरी संघटनेची कृषी विभागाकडे मागणी

पारनेर दि.२८ जून(प्रतिनिधी) :
सध्या पुरेसा पाऊस पडत आहे.शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे करण्याची लगबग सुरू झाली आहे.
सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे आणि शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर बियाण्याची आवश्यकता असून बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या बियाण्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ह्या सगळ्यात बाजारामध्ये बोगस बियाणे येणार नाहीत यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कृषी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने नजर ठेवायला पाहिजे. जर बाजारात बोगस बियाणे आलेत आणि शेतकरी बांधवांची नुकसान झाल्यास अश्या कंपनी अथवा कृषी केंद्र चालकांविरुध भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया आणि आंदोलन केले जाईल असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बोगस बियाणे विक्री होऊ नये. शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये. यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून बियाणे अथवा खत खरेदी करताना पक्के बील घ्यावे. तसेच सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना जितके मागणी खताची केली जाईल तितके खत उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच खत खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे लिंकिंग करू नये. शेतकरी बांधवांना पक्के बिल द्यावेत.कृषी अधिकारी यांनी बाजारात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे.तसेच बोगस बियाणे करणाऱ्या मार्केटिंग प्रतिनिधी,बोगस खत विक्री करणारे यांवर लक्ष ठेवून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व केंद्र चालक यांनी बाहेर मोठ्या अक्षरात खतांच्या स्टॉक ची माहिती फलक सर्वांना दिसेल अशा पद्धतीने बाहेर लावावा. अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, कारभारी आहेर, प्रदेश सचिव किरण वाबळे, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष राम वाडेकर, जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, जिल्हा सचिव संतोष कोरडे, जिल्हा प्रवक्ते संतोष हांडे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल ऊगले, सचिन सैद, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब झांबरे, तालुका अध्यक्ष विशाल करंजुले, तालुका प्रवक्ते राजू रोकडे, संपर्क प्रमुख महेश झावरे, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, नंदु साळवे, नंदन भोर, संदिप जाधव, संतोष गागरे, मंजाबापु वाडेकर, तालुका विद्यार्थी उपाध्यक्ष अनिकेत आंधळे, कर्जुले शाखाध्यक्ष प्रविण आंधळे शाखा अध्यक्ष कर्जुले हर्या प्रवीण आंधळे, तालुका सचिव अन्सार पटेल, पाटील काशिद, नाना काशिद तसेच शेतकरी बांधवांनी केली आहे.
******
“कृषी विभागाच्या वतीने खतांच्या कृत्रिम टंचाई,बोगस बियाणे,बोगस बियाणे विक्री करणारे प्रतिनिधी,यांकडे बारीक लक्ष ठेवून तालुक्यात बोगस बियाणे विक्री होणार नाही तसेच युरिया खताची अथवा इतर खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही.याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच कृषी विभागाने भरारी पथक नेमताना त्यात पत्रकार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी,प्रगतशील शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते यांनाही सामील करून घ्यावे,जर बोगस बियाणे आणि कृत्रिम खत टंचाई निर्माण झाल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.”
संतोष वाडेकर
(अध्यक्ष : भुमिपुत्र शेतकरी संघटना)