सामाजिक

कापड बाजार शहाजी रोड, घास गल्ली रिक्षा स्टॉप येथे पोलीस चौकीचे स्वागत करत अधिकृत रिक्षा थांबा अबाधित ठेवण्याची अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेची मागणी कोतवाली पोलीस निरीक्षक शिंदे यांना दिले निवेदन!

अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजारात पोलीस चौकी उभारण्याचा निर्णय दिवाळी सणाच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कापड बाजारात शहाजी रोड चौकात पोलीस चौकी उभारण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या चौकी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन देखील झाले असून लोकार्पण देखील दिवाळीपूर्वीच होणार असून या ठिकाणी शहाजी रोड घासगग्ली येथे रिक्षा थांबा 1972 पासून अधिकृत आहे. येथे 10 रिक्षा थांब्यासाठी परवानगी आहेत. येथे गोरगरीब रिक्षा चालक आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत असून जर त्याच रिक्षा स्टॉप समोर पोलीस चौकी केली तर तेथे रिक्षा स्टॉप साठी अडथळा होईल व रिक्षा चालकांचा व्यवसाय डबलघाईस येईल त्यामुळे पोलीस चौकीचे स्वागत करून अधिकृत ऑटो रिक्षा थांबायला कोणतेही अडचण होणार नसून पोलीस चौकी करावी व रिक्षा थांबयावर लावण्यासाठी पांढरे पट्टे व साईडने पाईप लावण्यात यावे. या मागणीसाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पी.आय.संपत शिंदे यांना निवेदन देताना अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, सय्यद कयुम, सैफ शेख, समीर शेख, नासिर खान, देविदास बेरड, दिलीप गायकवाड, पैलवान इलाईबक्ष, अनिस तांबटकर, उजेर खान, शोहेब शेख, रशीद शेख, अनवर खान, नासिर तांबोली, दीपक गहिले पोपट काडेकर अदिसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट. कोतवाली पोलीस स्टेशनचे पी.आय.संपत शिंदे म्हणाले की पालिकेला प्रस्ताव पाठवून रिक्षा थांबयावर पांढरे पट्टे व साईडने पाईप लावण्यात येणार असल्याचे सांगून रिक्षा चालकांना पोलीस चौकीचे कोणताही अडथळा येणार नाही असे आश्वासन दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे