
अहमदनगर (प्रतिनिधी )नगर शहरातील चितळे रोडवरील प्रसिध्द चाफे फरसाण मधील मिठाई मध्ये तांब्याची तार आढळल्याने शहरातील ग्राहकांच्या जीवनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याबाबतची माहिती अशी की चार दिवसांपूर्वी ग्राहक सुनील शिंदे यांनी खुरमा मिठाई विकत घेतली.
ही मिठाई खात असताना सदर प्रकार लक्षात आला .त्यामुळे एक जीवितहानी होऊ शकली असती सदर बाबीचा विचार प्रशासनाने करावा.व योग्य कठोर कारवाई चाफे फरसाण दुकानावर करावी. याबाबत अन्न औषध प्रशासनास पत्र दिले असून कारवाई मागणी केली आहे.कार्यवाई न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.याबाबतीत काय कारवाई होते याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.