आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे श्री.संत गाडगे महाराज छात्रालय या वसतिगृहात सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा

अहमदनगर दि. 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी ):- सामाजिक न्याय विभागाच्या ९१ वा स्थापना दिनानिमित्त शहरातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे श्री संत गाडगे महाराज छात्रालय स्टेशन रोड अहमदनगर या वसतिगृहात ९१ वा सामाजिक न्याय विभागाच्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संत गाडगे महाराज छात्रालय या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शहरामध्ये प्रभात फेरी काढुन सामाजिक न्याय दिनाच्या घोषणा देऊन परिसर घोषणाने दन दणाणून सोडला प्रभात फेरी सुरुवात राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल येथून झाली मार्केट यार्ड महात्मा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने मार्केट यार्ड चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सामाजिक न्याय विभागाच्या घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले. प्रभात फेरीचा समारोप राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल येथील संत गाडगे महाराज छात्रालय या वस्तीगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक बाबासाहेब लोंढे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब लोंढे व वसतिगृहाचे अधिक्षक बाबासाहेब पातकळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन बाबासाहेब पातकळ यांनी सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवसाचे उदिष्ट व या विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सखोल माहिती देऊन वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सांगितले की या योजनेची माहिती आपल्या गावातील सामाजिक न्याय विभागाच्या योजने पासून वंचित राहिलेल्या घटकापर्यंत पोहोचून सामाजिक न्याय विभागाच्या योजनेच्या संदर्भात सर्व माहिती देण्याची विद्यार्थ्यांना सूचना केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब लोंढे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध प्रकारच्या मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली देऊन विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती चा फायदा घेण्याची माहिती दिली. ९१ व्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापना दिवसानिमित्त प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी तुकाराम विघ्ने,राहुल लबडे विषेश परिश्रम घेतले.