अहमदनगर दि. 25 ऑगस्ट(प्रतिनिधी )
राज्यातील शिक्षण क्षेत्रात विनाअनुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षण संस्थांची संख्या मोठी आहे. येथे काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शासन अनुदानित संस्थांतील कर्मचारी यांचं काम सारखच आहे. मात्र वेतनात प्रचंड तफावत आहे. विनाअनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगारात काम करावे लागते. या महत्वाच्या समस्येसह कर्मचाऱ्यांना आणखीही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने विनाअनुदानित शिक्षणव्यवस्था न्याय व हक्क परिषदेच्यावतीने भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चर्चासत्र होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब क्षेत्रे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, डॉ. प्रमोद तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे आयोजक सुदाम लगड यांनी केले आहे.