केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज मागासवर्गीय खासदारांना स्नेहभोजन

नवी दिल्ली दि.6(प्रतिनिधी) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नवी दिल्लीतील 11 सफदर जंग रोड या शासकीय निवासस्थानी देशभरातील एससी एस टी प्रवर्गातील खासदारांसाठी आज दि.6 एप्रिल रोजी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पक्षांतील राज्यसभा आणि लोकसभा चे मागासवर्गीय संसद सदस्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजप सोबत रिपब्लिकन पक्ष एनडीए चा प्रमुख घटक पक्ष आहे.देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला रिपब्लिकन पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला होता.ना.रामदास आठवले यांनी गोवा; उत्तर प्रदेश ;मणिपूर या राज्यांत भाजप उमेदवारांचा चांगला प्रचार केला होता. उत्तर प्रदेश उत्तराखंड; गोवा आणि मणिपूर मध्ये भाजप ची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांना एनडीए मध्ये देश पातळीवर महत्व प्राप्त झाले आहे. केंद्रसरकार मध्ये आंबेडकरी चळवळीचा चेहरा; दलित बहुजनांचा प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय नेतृत्व ना.रामदास आठवले यांचे ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दि.6 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास मागासवर्गीय
खासदार मोठया संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिध्दीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.