भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मयूर बोचूघोळ तर उपाध्यक्षपदी स्वप्नील बेंद्रे

अहमदनगर दि.20 नोव्हेंबर (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष ऍड अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्च्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी मयूर बोचूघोळ यांची अध्यक्षपदी तर सर्व सामान्य बहुजन कुटूंबातील स्वप्नील चंद्रकांत बेंद्रे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना मयुर बोचुघोळ म्हणाले, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांच्या मान्यतेने भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकरिणीत सर्व घटकांतील युवकांचा समावेश केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नुतन पदाधिकारी युवकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहतील. केंद्र व राज्य सरकारच्या युवकांसाठीच्या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम करतील. भाजपा पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाशी युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या नुतन पदाधिकार्यांचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, नगर शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, सचिन पारखी, भैया गंधे, बाबासाहेब वाकळे आदिंसह अनेकांनी अभिनंदन केले.