सामाजिक
दरेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

दरेवाडी दि. १ ऑगस्ट (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदी वातावरणात साजरी होत असते. नगर तालुक्यातील दरेवाडी गावात नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत साजरी करण्यात आली. यावेळी दरेवाडी गावचे सरपंच अनिल करांडे, देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,देशस्तंभच्या जिल्हा प्रतिनिधी गौतमीताई भिंगारदिवे, सामजिक कार्यकर्ते अक्षय भाऊ भिंगारदिवे,
यतिंद्र देठे, अक्षय शिंदे, विकास शिंदे, आदित्य साठे, सूरेश कसाब, प्रकाश पाटोळे, आदी उपस्थित होते.