भिंगार शहरातील मटक्याच्या धंद्याकडे पोलिसांचा कानाडोळा,कारवाई शून्य

अहमदनगर दि.९(प्रतिनिधी) भिंगार शहर व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सट्टा,मटका, जुगार काही ठिकाणी बिंगो अशाप्रकारचे बेकायदेशीर धंदे खुलेआम तेजीत सुरू आहेत. भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या या धंद्यावर पोलिस काहीच कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या धंद्याना नेमके अभय कोणाचे? अशा प्रश्नार्थक चर्चा भिंगार शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
भिंगार शहरात शुक्रवार बाजारात नागपुरे चहावाल्या समोर,हजारे बंधू भेळ सेंटरच्या उजव्या बाजूला,सुलभ स्वचछतागृहाच्या बाजूला तसेच पाण्याच्या टाकीखाली दोन बिंगो व शुक्रवार बाजारात एक बिंगो नावाचा जुगार व आपण कधी बारकाईने निरीक्षण केले तर त्याठिकाणी मटका खेळण्याचा उद्योग दररोज सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल. विशेष म्हणजे हा सर्व परिसर भिंगार पोलीस ठाण्याच्या जवळच आहे. नगर- पाथर्डी रस्त्यावर वडारवाडी येथे त्रिमूर्ती कापडाच्या दुकानासमोर,त्याच रस्त्यावर दिलखुश चिकन दुकाना शेजारी,नगर पाथर्डी विजय लाईन येथील रिक्षा स्टॉप शेजारी,तसेच त्याच रस्त्यावर पंचशील कमानी शेजारी व पोलीस लाईन मटका चालतोय तसेच भंडारी दाताच्या दवाखान्याशेजारी भोले चहावाल्या समोर मटक्याचे धंदे पडदे लावून सुरू आहेत. या सर्व बेकायदा धंद्यावर भिंगार पोलिसांची कारवाई शून्य असल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. कळतय पण वळत नाही.अशी भूमिका बजावली जात आहे.यासर्व प्रकारावर पोलिसांचीच मुक संमती आहे का?असा सवालही भिंगार शहरातील नागरिकांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जातोय. याबाबत पोलीस काय कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.