सामाजिक
कर्जत तालुक्यातील कौडाने गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी!

कौडाने दि. १७ एप्रिल (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील कौडाने येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त कौडाणे गावात रविवार दि १६ रोजी विविध उपक्रम राबवण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये गावातील युवा व तरुण वर्गाने रक्तदान केले व भव्य मिरवणूक सोहळा पार पाडला. या कार्यक्रमासाठी कौडाने गावचे सरपंच प्रवीण सुद्रिक माजी सरपंच दीपक जगधने तसेच माजी सरपंच धनराज सुद्रिक तसेच माजी उपसरपंच अनिल गंगावणे ग्रामपंचायत सदस्य नितीन गंगावणे तसेच संतोष गंगावणे गणेश गंगावणे उमेश गंगावणे बाळू गंगावणे सतीश गंगावणे आदींनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.