अहमदनगर दि. 27 सप्टेंबर (प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून बालिकाश्रम रस्त्यावरील निलक्रांती चौक गौतम नगर येथील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे.
गौतमनगर येथील रस्त्यावर लगतचे ड्रेनेज तुंबलेले असल्यामुळे त्यातील मैलमिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास होत आहे. त्यातच सध्या चिकनगुण्या, हिवताप, डेंग्यू, उलट्या, जुलाब यासारख्या साथीच्या आजरांची साथ चालू आहे. बरेच नागरिक यामुळे आजारी आहेत.
नागरिक आहेत आरोग्याच्या प्रश्नानी त्रस्त! महापालिका प्रशासन मात्र सुस्त!
एकीकडे महानगर पालिका स्वछता अभियान राबवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे नागरिकांना आवाहन करत असून आयुक्त साहेब स्वत: नगर शहरातील स्वछता अभियाना मध्ये भाग घेऊन स्वछता करत असल्याचे सध्याचे चित्र आहे. मग गौतम नगर मधील नागरिक आरोग्याच्या गंभीर प्रश्नानी त्रस्त असतांना, महानगरपालिका प्रशासन का सुस्त आहे? आयुक्त साहेब गौतम नगर येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतील का? आयुक्त साहेब येथील स्वच्छतेकडे कधी लक्ष घालणार? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यावर महानगर पालिकेने तातडीने ज्याप्रमाणे शहरात स्वछता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येथे देखील आपल्या कर्मचाऱ्याकडून स्वछता करावी अशी नागरिकांची अपेक्षा असणे स्वभाविकच आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा