पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो.व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग श्री. विवेकानंद वाखारे सो. व मा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांचे पथकामधील पोना/गोकुळ इंगावले, पोना/संतोष साबळे (नेम-SDPO कर्जत भाग), पोकों/संदिप शिरसाठ, पोकों/आनंद मैड, पोकों/संदिप राऊत,मोबाईल सेल दक्षिण विभागाचे नितीन शिंदे /राहुल गुड्डू यांच्या तांत्रिक मदतीने असे पोस्टे हददीतील पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना मा.पो.नि श्री. किरण शिंदे सो, यांना गुप्त् बातमीदारामार्फत मिळाली की, बेलवंडी पो.स्टे गु.रजि.नं-353/2021 भादंवि कलम 395,420,120 (ब) वगैरे सह मोक्का अधि.1999चे कलम 3(i) (ii), 3(2),3(4) प्रमाणे मधील पाहीजे आरोपी शंभ्या कुंज्या चव्हाण रा. सुरेगांव ता.श्रीगोंदा हा पोस्टे हददीत वडाळी रोड परीसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर परीसरात सापळा रचुन शंभु ऊर्फ शंभ्या कुंज्या चव्हाण वय-30 वर्षे रा. सुरेगांव ता. श्रीगोंदा यांस ताब्यात घेतले आहे.
नमुद गुन्हयातील आरोपी नामे शंभु ऊर्फ शंभ्या कुंज्या चव्हाण वय-30 वर्षे रा. सुरेगांव ता. श्रीगोंदा हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी बेलवंडी पोलीस स्टेशनला दरोडा व जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री. विवेकानंद वाखारे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग व पोना/संतोष साबळे (रायटर) हे करीत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा