१,०४,५०० – रुपये किंमतीचे अवैध गावठी हातभट्टीचे साधने व तयार दारुचा साठा स्थानिक गुन्हेशाखेने केला उध्वस्त!
नगर तालुक्यातील अवैध धंदयावर छापे: ३आरोपी विरुद्ध कारवाई

अहमदनगर दि. १९ (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर , पोहेकॉ.बबन मखरे , पोहेकॉ.देवेंद्र शेलार,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस नाईक सचिन आडबल,पोलीस कॉन्स्टेबल.आकाश काळे, पोलीस कॉन्स्टेबल.मयुर गायकवाड व चोपोहेकॉ.संभाजी कोतकर यांचे स्वतंत्र पथक नेमूण जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुक्यामध्ये गुरुवार दि . १७/०३/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०३ ठिकाणी छापे टाकून एकूण १,०४,५०० / रु . किं . चा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ३ आरोपी विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . १ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६०/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : – ३८,५०० / -रु . किं . ची त्यामध्ये ३५ लि . तयार दारु व ७०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : – कानिफनाथ भिमोजी कळमकर रा . कळमकरवस्ती , नेप्ती , ता . नगर ( फरार) २ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६ ९ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : – ४३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ८०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : – राजू छबु पवार वय ३० , रा . नेप्ती , ता . नगर ३ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६२ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : – २३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ४०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : – राजेश बाजीराव पवार वय ४२ , रा . नेप्ती , ता.नगर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आग्रवाल, अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधीकारी ग्रामीण विभाग अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमंलदार यांनी केलेली आहे