सामाजिक

प्रेम म्हणजे प्रेम असतं.. मग सर्वांचं सेम का नसतं? भाग 2

© डॉ सचिन साळवे
समुपदेशक/ सायकॉलॉजीस्ट

मागील भागात आपण पाहिले की,
एकतर्फी प्रेम किंवा ब्रेकअप नंतर समोरच्या व्यक्तीला ईजा करणे किंवा आत्महत्या करणे या घटनांनी सर्वजण हादरून जात आहेत.
या भागात अशा घटना घडायला काय कारणे असतील व काय काळजी घ्यावी? यांचा विचार करणार आहोत.
या संदर्भात असे, सांगता येईल की एखाद्या व्यक्ती बद्दल आकर्षण,आपुलकी निर्माण व्हायला लागते ,त्याला हे प्रेम नाव देतात.त्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा भाग बनविण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
मग नाते पुढे नेण्यात काहीना यश येते तर काहीना अपयश किंवा काहींना नकार मिळतो.
*_खरे तर हे प्रचंड ऊर्जा असलेले तरुण वय… आयुष्याला आकार देण्याचे,मेहनत करून स्वतः ला घडविण्याचे,उज्वल भविष्य साकार करण्याचे आणि स्वतः चे व पालकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे असते._*
परंतु भावनेच्या भरात किंवा आकर्षणात या वयातील प्राधान्य क्रम चुकला की,
(अभ्यास/करिअर वर लक्ष न देता जोडीदार निवड वर लक्ष दिल्यास ) भविष्यावर विपरीत परिणाम होऊन आयुष्य ढासळले आहे,असे अनेक उदाहरणे बघायला मिळतात.
ही तरुणाई, तारुण्यात असल्याने, सतत भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतात.
मेदुंत असंख्य भावना रेंगाळत असतात.
मागील भागात पाहिले की,प्रेमात असताना आकर्षण,आपुलकी,जिव्हाळा अशा अनेक प्रकारच्या भावनांचा खेळ चालू असतो.
त्या भावना मनाला सुखद अनुभव देवून जात असतात ,त्यामुळे त्यातच दंग रहावेसे वाटते आणि त्या व्यक्तीचा सहवासात सतत हवाहवासा वाटत रहातो.
परंतु ज्यावेळी समोरची व्यक्ती नकार देते किंवा ब्रेकअप केले जाते त्यावेळी भावनांच्या या टोकाचा प्रवास दुसऱ्या वेदनादायी भावनांच्या टोका कडे सुरू होतो .
या वेदना सहन न झाल्याने ज्या व्यक्तिवर आपले प्रेम आहे असे म्हणत होतो त्या व्यक्तीला किंवा
स्वतः ला ईजा करण्याची मानसिकता होत असेल,तसा विचार मनात येत असेल तर आपले नक्की प्रेमच होते की अजून काही..याचा विचार करावा.
भावनेच्या भरात उचललेले टोकाचे आणि धोकादायक पाऊल दुसऱ्याचे आयुष्य संपविते ,आपलेही आयुष्य बरबाद करते आणि मग दोन्ही कुटुंब ही उध्वस्त होतात.

*त्या क्षणात घडलेल्या घटनाक्रमात मुख्य भूमिका असते ती भावनांची..*

स्वतः ला योग्य प्रकारे ओळखणे व स्वतः च्या भावनांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येणे..हे भावनिक बुद्धिमत्ते मधील महत्वाचे घटक.
काही जण दुसऱ्याचे मन समजावून घेण्यात पटाईत असतात,तर काही जणांना स्वतः वर ईतका अति विश्वास असतो की दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं त्यांना जमतच नाही.
हे घटक एकतर्फी प्रेम किंवा जोडीदारांना विलग होताना खूप महत्वाची भूमिका बजावतात.
प्रेम प्रकरणात नकार किंवा अपयश आले की जिव्हाळा,आत्मीयता ,आकर्षण ई. चे रूपांतर राग ,द्वेष,मत्सर, संताप या नकारात्मक भावंनामध्ये होत असेल तर अहंभाव माणसाला माणसांपासून दूर करतो मग ते किती हिं प्रेमाचे माणूस असू द्या.
त्या नकारात्मक भावना दुसऱ्या माणसाच्या मनाचा किंवा भावनांचा विचार करू देत नाहीत आणि या नकारात्मक भावनांच्या भरात किंवा त्याच्या अति प्रभावा मुळे टोकाचे पाऊल उचललले जाते.
कोणताही मागचा पुढचा विचार केला जात नाही.
कारण नकारात्मक भावनांचा प्रभाव ईतका जास्त असतो की सारासार विचार करण्याची शक्ती लोप पावली जाते.
सारासार विचार न करता प्रतिक्रिया दिल्या जात असतील तर आपल्या भावनांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे.पुढे घडण्याऱ्या विनाशकारी प्रसंगावर नियंत्रण ठेवता येवू शकते .
मनाशी ठरविले तर कोणत्याही भावनांच्या आहारी जाण्यापासून आपण स्वतः ला निश्चितपणे रोखू शकतो.

इतर काही घटक जे प्रेमप्रकरणातील हिंसाचार साठी कारणीभूत असू शकतात.

# स्वभाव दोष/ वर्तणूक समस्या

# घरातील वातावरण

# सोशल मीडिया

# मित्र/मैत्रिणींचा दबाव
(peer pressure)

# पूर्व ग्रह किंवा नकारात्मक अनुभव

आणि इतर अनेक घटक कारणीभूत असू शकतात.
आपण चुकीच्या नात्यात आहोत की काय?
हे योग्य वेळी कसे ओळखायचे असा प्रश्न नेहमी विचारला जातो
त्याची संभाव्य लक्षणे ही खाली दिली आहेत

• Over-possesiveness –
काळजी घेणे आणि अति पझेसिव्ह असणे यात फरक आहे. *असुरक्षिततेच्या भावनेतून over possesiveness असू शकतो*
दुसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो.प्रत्येक ठिकाणी controling nature असेल किंवा जास्तच बारीक सारीक गोष्टीत involve होत असेल .

• Trust issue ,सतत अविश्वास दाखवीत असेल तर –
हे समजून यायला हवे की आपल्या पार्टनर आपल्यावर किती विश्वास ठेवत आहे.

• Anger issues,पार्टनर च्यां रागीट स्वभावाचा त्रास होत असेल तर

• व्यसनाधीन असेल आणि त्या अवस्थेत त्रास देत असेल तर

• Friend circle,संगतीत असलेले मित्र मैत्रिणी कसे आहेत,यावरून अंदाज घ्यावा.

• Dominating behaviour
दुसऱ्याचे मत/निर्णय विचारात न घेण्याची वृत्ती असेल तर

• पार्टनर च्या करिअर किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य मध्ये स्वारस्य दाखवत नसेल तर

• आर्थिक –
विनाकारण जास्त महागड्या भेट वस्तू देणे किंवा वेळोवेळी पैशाची मागणी करणे.
किंवा आर्थिक स्वातंत्र्य नसणे.

• Physical harm to partner or self harm
सतत शारीरिक किंवा मानसिक दुखापत करत असेल तर,ब्लॅकमेल करत असेल तर.

• स्वभावात किंवा नैतिक मूल्य यात खूप तफावत असणे,
हे पुढील आयुष्यात वादाचे कारण ठरू शकते

वरील काही संकेत आहेत जे नात्यातील भविष्यातील धोका टाळू शकतात.
तुमच्या नात्यात गुदमरल्यासारखे वाटत असेल किंवा कोणी अति प्रेम लादत असेल,ब्लॅकमेल करत असेल तर अशा वेळी आपल्या पालकांशी संवाद साधावा किंवा जवळचे मित्र मैत्रिणी, हितचिंतक यांना कल्पना द्या.
एखादा धोक्याचा सिग्नल पुढील मोठा धोका टाळू शकतो.

_मनरंग कौन्सेलिंग सेंटर_
_अहमदनगर_
_9822291118_

*प्रत्येक नाते हे यशस्वी होतेच असे नाही म्हणून नकार आणि अपयश हे मोठ्या मनाने स्विकारायला हवे.*
*आणि ज्या व्यक्ती वर प्रेम करत* *आहोत त्यावर unconditional प्रेम असायला हवे तर ते खरे प्रेम म्हटले जाते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे