अहमदनगर दि.19 जानेवारी (प्रतिनिधी ) आरटीओ ऑफिस ते त्यांनी चौक कोठला चौक, अप्पू हत्ती चौक, पत्रकार चौक, एसटी चौक, ते परत कोठला चौक,जीपीओ चौक चांदनी चौक ते आरटीओ कार्यालय अशी हेल्मेट रॅली रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्य काढण्यात आली सदर रॅलीत शहर वाहतूक शाखेचे दहा अंमलदार व शहर वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरक्षक मोरेश्वर पेंदाम तसेच आरटीओ कार्यालयातील कर्मचारी व आरटीओ इन्स्पेक्टर तसेच इतर 25 ते 30 नागरिक हेल्मेट घालून मोटार सायकलवर स्वार होऊन रियालिप्स सामील झाले होते सदर रॅली द्वारे चौका चौकात हेल्मेट घालने जीवनासाठी अत्यावश्यक असून सीट बेल्ट सुद्धा आवश्यक आहे तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये असे वरील चौकात सर्वसामान्य वाहन चालक मालक व प्रतिष्ठित नागरिकांना आवाहन करण्यात आले पत्रकाराकडून व नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला शांतता राहिली.
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासन व शहर वाहतूक शाखा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा