सामाजिक

शेवगाव मध्ये ऊसतोड बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेवगाव दि.२१ नोव्हेंबर (प्रतिनिधी )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र मध्ये पुकारलेल्या ‘ऊसतोड बंद’ आंदोलनाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, नेवासा, पाथर्डी,राहुरी या तालुक्यात उस्फूर्तपणे प्रतिसाद पहावयास मिळाला.
या आंदोलनास साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर, चालक-मालक तसेच मुकादम संघटना यांनी स्वयंपूर्ण दोन दिवस बंद ठेवून राजू शेट्टी यांच्या हाकेला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
ऊसाला प्रति टनामागे एफ आर पी पेक्षा ३५० रुपये अधिक दर अधिक मिळावा, सर्व कारखान्यांचे वजन काटे हे ऑनलाईन व्हावेत, मागील गाळपातील ऊसाला दोनशे रुपये अधिक द्यावेत तसेच सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे एक रकमी एफ आर पी शेतकरी ऊस बाबतदार यांना देण्यात यावी व दोन टप्प्यात करण्यात आलेल्या एफआरपीचा कायदा रद्द करण्यात यावा, इथेनॉलच्या लिटर मागे पाच रुपयांनी दरवाढ करावी, तसेच साखरेची किंमत ३,१०० वरून ३,५०० रुपये करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी १७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला शेवगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रशासन कारखाना प्रशासन यांना विनंती करून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोकनेते मारूतरावजी घुले पाटील सहकारी साखर कारखाना, गंगामाई साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांची बाजू उचलून धरून कारखाना बंद ठेवला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी सर्व कारखान्यांचे संचालक तथा व्यवस्थापक यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी हे निर्णय व्हावेत यासाठी सर्वच साखर कारखान्यांनी पाठबळ द्यावे अशी विनंती यावेळी कारखानदारांना केली होती. कारखानदारांनीही ते मान्य करून या संपात आपला दोन दिवसीय प्रतिसाद दिल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी सांगितले.
‌‌ या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे,
स्वाभिमानी संघटनेचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र आर्ले मामा,
जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब पाचरणे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, शेवगाव तालुका उपाध्यक्ष मेजर अशोक भोसले, रमेश कचरे, स्वाभिमानी युवकचे अमोल देवढे, युवक चे उपाध्यक्ष विकास साबळे, दादा टाकळकर,नाना कातकडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आज शेवगाव मध्ये काही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ट्रक व ट्रॅक्टर या वाहनांच्या टायरची हवा सोडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना या संपात सामील व्हावे यासाठी विनंती केली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

******

शेतकऱ्यांनो आपल्या हक्कासाठी एकत्र या,
जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे
ऊस दरासाठी व आपल्या हक्काच्या पैशासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवावी. तसेच आपल्या हक्कांच्या लढाईसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र असे आवाहन यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे