गुन्हेगारी

गावठी हातभट्टी दारू पोलिसांचा अड्ड्यावर छापा 56,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर दि.24 सप्टेंबर (प्रतिनधी):आज दि 23/9/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत शिंगवे तालुका राहाता शिवारात गावठी हातभट्टी अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी राहाता तालुक्यातील शिंगवे शिवारातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन तयार गावठी हातभट्टीवर कारवाई करून 56,500 रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे सदर बाबत पोलीस नाईक श्याम जाधव यांचे फिर्यादीवरून राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर dysp संदीप मिटके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका इरफान शेख ,अशोक शिंदे,श्याम जाधव , जिने यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे