अहमदनगर दि. 25 सप्टेंबर (प्रतिनिधी ) पुणे येथील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल व सिमरन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू, काचबिंदू, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, लासूर,तिरळेपणा, लॅसिक,पडद्याचे विकार,व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच मुकुंदनगर येथील सिमरन अकॅडमी येथे सम्पन्न झाले.
यावेळी नगर जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील रुग्णांनी या मोफत शिबिराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला.
यावेळी डॉ. विशाल भिंगारदिवे, सिमरन अकॅडमीच्या अध्यक्ष फरजाना शेख, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या शबाना शेख, देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देशस्तंभ न्यूजचे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे तसेच मोठया प्रमाणात रुग्ण उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा