सामाजिक
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे उद्या श्रीरामपूर दौऱ्यावर हरेगाव येथे पीडित कुटुंबीयांची घेणार भेट!

अहमदनगर दि.२९ ऑगस्ट(प्रतिनिधी)
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे हे उद्या ३० ऑगस्ट रोजी श्रीरामपूर दौऱ्यावर येत असून ते हरेगाव येथे येऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली. .
त्यांच्या समवेत प्रदेश सचिव प्रा जयंत गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश नेते नितीन कसबेकर , जिल्हा नेते सोमा शिंदे , जिल्हा सचिव महेश भोसले , महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे , युवा नेते विशाल गायकवाड , शहर अध्यक्ष किरण जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सर्व कार्यकर्ते व भीमसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामपूर तालुका प्रमुख संतोष मोकळ यांनी केले आहे