स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवादिनी श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने श्री तांदळेश्वर विद्यालयात बक्षीस वितरण सोहळा संपन्न

तांदळी दुमाला दि. १६ ऑगस्ट (प्रतिनिधी)
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावातील श्री तांदळेश्वर विद्यालयात श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे-चखालेवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवादिनी प्रमाणपत्र, ट्रॉफी आदींनी गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने ॲड.अभय(नरेंद्र) बापुराव भोस, वैभव तात्याराम हराळ, दिगंबर ढोले, रोहित धालवडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संजय निगडे,सोसायटी चेअरमन संजय शेळके, माजी सरपंच हौसराव बोरुडे, उपसरपंच राजु भोस,स्कूल कमिटी अध्यक्ष बापूसाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य झुंबरराव खुरांगे, गौरव खिवंसरा तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक देवराव दरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबासाहेब चांडे यांनी मानले.