जामखेड तालुक्यातील अवैध खडी क्रेशर प्रकरणी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याना काळे झेंडे दाखविणार: अफसर शेख संस्थापक मानव विकास परिषद

अहमदनगर दि. १४ ऑगस्ट (प्रतिनिधी)जामखेड तालुक्यातील अवैध खडी क्रेशर प्रकरणी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती मानव विकास परिषदेचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख संस्थापक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यातील मोहा गावामधील अवैधरित्या खडी क्रेशर चालून पर्यावरणाचा नाश होत आहे या संदर्भात जामखेड तालुक्यातील सतीश पवार मानव विकास परिषद तालुका उपाध्यक्ष जामखेड यांनी २२-७-२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अवैद्य खडी क्रेशर चालकावर खानधारक तसेच जामखेड तालुका तहसीलदार मंडलाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली होती. 27/ 07 /2023 रोजी सतीश पवार हे नेहमीप्रमाणे शेती कामाच्या कामासाठी शेतीत गेले असता खडी क्रेशर चालकांनी वीस ते पंचवीस लोकांनी शेतीमध्ये पवार यांना बेदम मारहाण केली. तसेच त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून नेऊन तहसीलदार आणि आमच्या विरोधात वरिष्ठ कार्याला तक्रार का करतो तुला जीवे मारू ठार मारून टाकू आमच्या विरोधात तू काही करू शकत नाहीस आमचे हात लांबपर्यंत आहे. अशी धमकी देऊन मारहाण केली. घडलेल्या घटनेचा मानव विकास परिषद संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी जाहीर निषेध केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 /8 /2023 रोजी संस्थेच्या माध्यमातून उपोषण सुरू करण्यात आले. जोपर्यंत योग्यरीत्या कारवाई होत नाही. तोपर्यंत आमरण दहा तारखेच्या दुसऱ्या उपोषण सुरू होतं परंतु 11/07/ 2023 संध्याकाळी रोजी सतीश पवार उपोषण करते यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अद्याप जिल्हाधिकारी कार्याकडून कसलेही प्रकारे कारवाई झाली नाही. किंवा लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आलं नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब तसेच प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, की आपण आपल्या कार्यालय मार्फत 14 तारखेच्या संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्यात यावा. अन्यथा मला नाईलाजाने येत्या 15 ऑगस्ट या दिवशी महसूल मंत्री व पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहे . अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली अफसर शेख संस्थापक मानव विकास परिषद भारत तसेच पवार कुटुंबिया तर्फे याची आपण दखल घ्यावी.