राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे गोमास, जिवंत जनावरे व साधने स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त

अहमदनगर दि. ८ ऑगस्ट (प्रतिनिधी) नगर शहरातील झेंडीगेट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे गोमास, जिवंत जनावरे व साधने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक
राकेश ओला साहेब, यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/संदीप पवार, अतुल लोटके, पोना/संतोष लोढे, संतोष खैरे, पोकॉ/आकाश काळे, रविंद्र घुगांसे, जालिंदर माने व बाळासाहेब गुंजाळ अशांना बोलावुन कळविले आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अहमदनगर येथील झेंडीगेट परिसरात काही इसम गोवंशी जातीची जिवंत जनावरे डांबुन ठेवुन त्यांना अमानुषपणे वागवुन, त्यांची कत्तल करुन विक्री करत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील प्राप्त माहिती प्रमाणे खात्री करुन अहमदनगर शहरात झेंडीगेट परिसरात दोन ठिकाणी कारवाई करुन 575 किलो गोमास व तुकडे, 20 लहान मोठी जिवंत जनावरे व दोन सुरे असा एकुण 3,20,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द 02 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन व गु.र.नं व कलम आरोपीचे नाव जप्त मुद्देमाल
1. कोतवाली 901/23 भादविक 269, 34 सह मपुसुअक 5 (अ) (ब) (क), 9 (अ)(ब) 1) इरफान इजाज कुरेशी वय 32,
2) नसीर शेख (फरार)
दोन्ही रा. हमालवाडा, झेंडीगेट, अहमदनगर 90,100/- 75 किलो गोमास, पाच लहान मोठी जिवंत जनावरे व सुरा
2. कोतवाली 902/23 भादविक 269, 34 सह मपुसुअक 5 (अ) (ब) (क), 9 (अ)(ब) 1) झिशान अय्याज कुरेशी वय 29,
2) शब्बीर कासम कुरेशी वय 54 दोन्ही रा. सुभेदारगल्ली, झेंडीगेट, अहमदनगर
3) तन्वीर मोहंमद कुरेशी वय 40, रा. सदर बाजार भिंगार, अहमदनगर 2,30,100/- 500 किलो गोमास, पंधरा लहान मोठी जिवंत जनावरे व सुरा
एकुण 5 पुरुष आरोपी 3,20,200/- 575 किलो गोमास, वीस लहान मोठी जिवंत जनावरे व दोन सुरे
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.