आरोग्य व शिक्षण

डॉ .बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमची श्रीरामपूर येथे आढाव बैठक संपन्न

राहुरी / प्रतिनिधी — दिनांक १३ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे राज्याचे ऊर्जा मंत्री ना.डॉ. नितीन राऊत मार्गदर्शक असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य या सामाजिक सघटनेची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रसंगी बोलताना श्री भोसले म्हणाले आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री ना. डॉ. राऊत महाराष्ट्रभर दौरे करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न काँग्रेस पक्षाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून समजून घेवून सर्व सामान्य गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काँग्रेस पक्षाच्या व फोरमच्या माध्यमातून काम करत आहे. गरीबातील गरीब व्यतीला शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा सर्वसामान्यांना मिळायल्या हव्यात बरोबरच सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचार होतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फोरमच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कदम म्हणाले कि आपण सर्वांनी युवकाचे रोजगाराचे, प्रश्न, महिलाना सक्षम व तरूणांना व्यवसायभिमुख बनविण्यासाठी आपण लवकरच फोरमचा श्रीरामपूर मध्ये महामेळावा फोरमचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. राजेशजी लाडे साहेब व फोरमचे प्रदेश महासचिव तथा औरंगाबादचे उद्योजक कुष्णा भंडारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.
या बैठकीचे आयोजन जिल्हा सचिव सचिव प्रकाश भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक कदम यांनी केले. सदर बैठकीत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सशक्त करण्याबाबत नियोजन ,करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील सर्व तालुके व शहर कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत व श्रीरामपूर येथे जिल्हास्तरावर बेरोजगार मार्गदर्शन व सघंटनकार्य मजबूत करण्यासाठी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर तालुकाध्यक्ष किरण घोलप, सचिन शिदे, संदीप डोळस, बाळासाहेब सगळगिळे, इनामदार, बजरंग दौंडे, किरण माळी, आल्फोन्स भोसले, उमेश साठे, बाबा साठे, थॉमस भोसले, जिल्हा समन्वयक अनुसगम शिदे सर, सुधीर भोसले, गोरक्ष आनाप पाटील, प्रदीप शिंदे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे