
अहमदनगर (प्रतिनिधी) डुप्लिकेट कमांडोला एलसीबीने ताब्यात घेतले आहे.
भारतीय सैन्य दलात अधिकारी असल्याचे भासवून बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र व चिन्ह वापरून नोकरीचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक करणारा तोतया सैन्य अधिकारी पकडण्यात आला आहे.
ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व मिलेट्री इंन्टेलिजेन्स दक्षिण कमान अहमदनगर यांची संयुक्त केली आहे.नवनाथ सावळेराम गुलदगड ( वय २४, रा. आग्रेवाडी म्हैसगाव ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलोल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.१९फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना मिलेट्री इंटेलिजेन्स, दक्षिण कमान अहमदनगर यांचेकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मांडवा ता. राहुरी परिसरात नवनाथ गुलदगड नावाचा इसम सैन्यदलात नोकरीस नसतानाही सैन्यदलाचा ड्रेस घालून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यावर “Commando” असे लिहलेले गाडीतून राहुरी, संगमनेर परिसरातील युवकांना सैन्यदलामध्ये भरतीचे आमिष दाखवून पैशाची मागणी करून फसवणूक करत आहे. अशी माहीती मिळाली. अहमदनगर जिल्हा व लगतचा पुणे जिल्हा हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचे व संवेदनशिल ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी बनावट सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करुन किंवा सैन्य दलाचे बनावट ओळखपत्राचा वापर करुन संबंधित सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. घटना निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेची गांभिर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अनिल कटके यांना बातमीतील इसमाची खात्री करुन मिलेट्री इंटेलिजेन्स दक्षिण कमान अहमदनगरचे अधिकारी यांना बरोबर घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.आदेशाप्रमाणे पोनि.श्री.कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे खास पथक तयार करुन पथकाने ही कारवाई केली.पथकातील अधिकारी व अंमलदार हे संशयित इसमाचा शोध घेत असतांना पोनि कटके यांना गुप्तबातमीदारा माहिती मिळाली की, एक मिलेट्री युनिफॉर्म घातलेला इसम हा मांडवा बु. ता. संगमनेर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जावून आरोपीचे ठावठिकाणा व मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव पत्ता नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाडी, पोस्ट म्हैसगाव ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यास मिलेट्रीमध्ये कोठे सर्विसला आहे, अशी विचारपूस केली असता त्याने बंगळुरु, कर्नाटक येथे लेफ्टनंट पदावर नोकरीला असल्याचे सांगितले. तसे ओळखपत्र दाखविले लागलीच संशईत इसमाबाबत मिलेट्री इंटेलिजेन्स पथकाचे अधिकारी यांनी त्यांचे विभागात चौकशी करुन खात्री केली असता इसम हा कोठेही सैन्यदलात सेवेत नसल्याचे सांगितले. त्यावर त्याचेकडे सखोल चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला.त्यामुळे या इसमाबाबत संशय बळावल्याने त्यास आणखीन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने मी परिसरातील युवकांना मिलेट्रीमध्ये नोकरीला असल्याचे खोटे सांगुन त्यांना मिलेट्रीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत होतो. युवकांना व पालकांना मी सैन्यात अधिकारी (कर्नल, कॅप्टन, सुभेदार) पदावर असल्याची खात्री पटण्यासाठी मी वेळोवेळी सैनदलाचा युनिफॉर्म घालुन त्यांचेकडे नोकरी करीता पैशाची मागणी करत असल्याचे सांगितले. युवकांना सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखविणारा नवनाथ सावळेराम गुलदगड, (वय २४, रा. आग्रेवाड़ी म्हैसगाव, राहुरी, जि. अहमदनगर) हा बनावट सैन्य अधिकारी असल्याची पथकातील अधिकारी व मिलेट्री इंटेलिजन्स विभागाची खात्री झाल्याने त्याचे कब्जात मिलेट्रीमध्ये सैन्यदलासाठी वापरण्यात येणारे ओळखपत्र, युनिफॉर्म व युनिफॉर्मवर लावण्याचे चिन्ह, नेमप्लेट व फित, आर्मीचे नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरुन घेण्यात आलेले आवेदन पत्रे, छापिल नियुक्ती पत्र (जॉयनिंग लेटर), आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर बनावट साहित्य मिळून आले.बनावट सैन्यअधिकारी नवनाथ सावळेराम गुलदगड हा वेळोवेळी स्वतःचे मोबाईल नंबर बदलून तसेच सैन्य दलातील वेगवेगळ्या वरीष्ठ अधिका-यांचे युनिफॉर्म वापरुन त्यांना सैन्य दलाचे बनावट जॉयनिंग लेटर देत असल्याने व फिर्यादीस सैन्यदलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याने त्याचे विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४९/२०२२ भादविक ९७०, १७९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यास ताब्यात घेऊन अधिक तपासाकामी राहुरी पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि.गणेश इंगळे, पोहेकॉ.संदीप घोडके, भाऊसाहेब कुरुंद, संदीप पवार, पोना.शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, देवेंद्र शेलार, पोकाॅ.मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, राहुल सोळुंके, विनोद मासाळकर व मिलेट्री इंटेलिजेन्सचे अधिकारी यांनी संयुक्त कारवाई केली आहे