जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यशवंत सेना अहिल्यानगर यांच्यावतीने दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा अहिल्यादेवी होळकर समाज भूषण पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी पुरस्कार देताना यशवंत सेना अहिल्यानगरचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर असे म्हणाले की , आपल्यासारख्या सत्याची कास धरणारा एक सामान्य कार्यकर्ता समाजपयोगी राबणारा दिव्यांगासाठी काम करणारा असे ओळख कायम ठेवलीत . आपण राजश्री शाहू , छत्रपती शिवाजी महाराज ,फुले , आंबेडकर ,अहिल्यादेवी यांच्या साहित्याच्या प्रभावातून पुरोगामी चळवळीच्या विचारांची ओळख निर्माण केली . आपल्या बुद्धी कौशल्य व भारतीय राज्यघटनेतील लोकशाही , समाजवाद, धर्मनिरपेक्षता ,राष्ट्रवाद विज्ञान भिमुकता या पंच सूत्रांना प्राणभुत मानून जनसेवा राष्ट्रहीत जोपासून सामाजिक समता दृढ करून निकोप सवर्धनाने आपल्या गावचे जिल्ह्याचे नाव उज्वल केलेत . यापुढेही आपल्या हातून दिव्यांगाचे प्रश्न सोडावेत अशी अशा बाळगतो .
समाजसेवा राष्ट्रबांधणी व जातीपातीच्या पलीकडचे मानवधर्माचे कार्य घडावे या उत्कंठ भावनेने आपणास अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे .
यावेळी रत्नाकर ठाणगे म्हणाले हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व दिव्यांगांचा आहे . दिव्यांग क्षेत्रात काम करत असताना दिव्यांगांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते . अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगाच्या अडी अडचणी, समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील .
यावेळी माधव गडदे सरसेनापती यशवंत सेना महाराष्ट्र राज्य , कांतीलाल जाडकर संस्थापक अध्यक्ष यशवंतसेना अहिल्यानगर , विजय तमनर जिल्हाध्यक्ष यशवंत सेना , श्रीमती ज्योती उनवणे महिला प्रमुख यशवंत सेना आदी उपस्थित होते .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा