फसव्या जाहिरातींच्या मोहाला बळी पडू नये : सपोनि. देशमुख स्नेहबंध व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन तर्फे श्नाइडर इलेकट्रीक येथे सायबर अवेअरनेस प्रोग्रॅमचे आयोजन

अहमदनगर दि. ११ फेब्रुवारी (प्रतिनिधी ): अनोळखी व्यक्तींच्या मागणीवरून कधीही ओटीपी शेअर करू नये. सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींच्या मोहाला बळी पडू नये. असे प्रतिपादन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केले.
श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. अहमदनगर येथे सायबर क्राइम अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे, स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, श्नाइडर इलेक्ट्रिकचे डायरेक्टर अरविंद पारगावकर, जनरल मॅनेजर दिलीप आढाव, सिनिअर जनरल मॅनेजर महेश चांडक, जनरल मॅनेजर अविनाश मांडे, जनरल मॅनेजर श्रीकांत गाडे, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष मधुकर निकम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, हृषीकेश गुणे आदी उपस्थित होते.
अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा आर कोड स्कॅन करू नये. ओएलएक्स, फेसबुक, इंस्टाग्राम, क्विकर यासारख्या सोशल मीडिया साईट वरून अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये, त्यांना पैसे पाठवू नये. असेही देशमुख म्हणाले.
यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे रनशेवरे म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाचा गैर वापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात. फसवणूक कशाप्रकारे होते याची अनेक उदाहरणे देऊन यापासून कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन केले.