आदर्श समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : वैद्य
स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा सन्मान
अहमदनगर दि.१८ (प्रतिनिधी) – स्नेहबंध सोशल फौंडेशनने अल्पावधीतच विविध समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केली आहे. आदर्श नागरिक घडविण्यासाठी मुलांवर बालपणापासून संस्कार होणे आवश्यक आहे. बालवयातच त्यांच्यावर उत्तम संस्कार केले गेले तर त्यांच्यातील सुप्त गुणांना विकसित केले जाऊ शकेल आणि एक आदर्श समाज निर्मितीसाठी हातभार लागेल. आदर्श समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यावयास हवे, असे प्रतिपादन पेन्सिल चित्रकार अक्षय वैद्य यांनी केले.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ पुणे येथे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्या निमित्त लातूर मल्टीस्टेट बँक कर्मचारी पेन्सिल चित्रकार अक्षय वैद्य यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सुनील वैद्य, सुषमा वैद्य उपस्थित होते.
वैद्य म्हणाले, बालवयातच मुलांवर उत्तम संस्कार केले गेले तर त्यांच्यातील सुप्त गुणांना विकसित केले जाऊ शकेल आणि एक आदर्श समाज निर्मिती मध्ये हातभार लागेल. मुलांचे पालक धावपळीत मुलांना अधिक वेळ देऊ शकत नाही, त्यासाठी स्नेहबंध फौंडेशन सारख्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवले तर संस्कार देण्याचे कार्य उत्तम रीतीने करता येईल, असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, ध्येय साध्य करण्यासाठी पुढे चालत असताना एक विचाराचे माणसे आपोआप मागे येतात.