कौतुकास्पद
माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांची नियोजन समिती योजना जिल्हा शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती

अहमदनगर दि. 28 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी उपशिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत असलेले बाळासाहेब बुगे यांची नियोजन समिती योजना जिल्हा शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले बुगे हे पारनेर येथे कार्यरत असताना त्यांच्या कार्यशैलीमुळे पारनेरच्या जनतेचे चाहते झाले होते. पारनेरवरून नगरला बदली झाली त्यावेळी पारनेरकरांनी त्यांनी त्यांच्या कामाची पावती म्हणून टू व्हीलर गाडी सप्रेम भेट दिली होती. त्यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी कोळी सर, शेख सर, सामाजिक कार्यकर्ते निलेश ठोंबरे, विलास बुगे आदी उपस्थित होते.