अहमदनगर दि. 27 फेब्रुवारी (प्रतिनिधी ):- जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, तहसिलदार शरद घोरपडे,प्रा. चंद्रकांत जोशी, शिवव्याख्याते प्रा. सिताराम काकडे, शशिकांत नजान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मराठी गौरव भाषा दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. प्रा. सिताराम काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व त्यांच्या कार्याची माहिती मनोगातुन दिली तर प्रा. चंद्रकांत जोशी यांनी मराठी भाषेचे महत्व विषद केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार शशिकांत नजान यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप पयायदानाने करण्यात आला.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा