महाराष्ट्रात जातीय व धार्मिक आतंक मांडला आहे. याला संरक्षण व अभय देण्याचे काम शिंदे फडणवीस सरकार करत आहे: अशोक गायकवाड सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने अक्षय भालेराव हत्तेचा निषेध नोंदवण्यासाठी १३ जुन रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जण आक्रोश मोर्चा!

अहमदनगर दि. ७ जून ( प्रतिनिधी ):- नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये जेष्ठ नेते अशोक गायकवाड म्हणाले की महाराष्ट्रात जातीय व धार्मिक आतंक (उच्चांद) मांडला आहे याला संरक्षण व अभय देण्याचे काम शिंदे फडणवीस सरकार करत आहे.
ते असे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव ची हत्या करण्यात आली आहे.
त्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध करीत आहोत
त्या साठी १३जुन रोजी महानगरपालिका अहमदनगर येथुन सकाळी १० वाजता मोर्चा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहे.
तरी अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सुमेध गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित अशोक गायकवाड,नितीन कसबेकर, प्रा.जयंत गायकवाड,महेश भोसले,
सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे ,रोहित आव्हाड, सोमा शिंदे, संजय कांबळे, किरण दाभाडे , सागर ठोकळ ,बंटी भिंगारदिवे,जीवन कांबळे आदी उपस्थित होते.