25 एप्रिलला फुले शाहू आंबेडकर पक्षाच्यावतीने शहरात होणाऱ्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा! धर्माच्या नावावर युवकांची माथी भडकून दोन गटात फूट पाडत असल्याचा आरोप – अशोक गायकवाड नितेश राणे यांना अटक करून शहरात बाहेरून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना रोखण्याची मागणी!

अहमदनगर दि. २१ एप्रिल (प्रतिनिधी)- नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दरम्यान बाजारपेठेत व्यापारावर हल्ला झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला मिरवणूक काढणारे मंडळ व आंबेडकरी जनतेमध्ये चितेचे वातावरण होते. तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून मिरवणुकीस बाधा येणार नाही अशी उपाययोजना केली. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जाती धर्म पेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती ही त्याची जमात असते नगरमधील व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत हल्लेखोर व्यक्तींना कडक शासन करावे तसेच व्यापारी हल्ला प्रकरणात जिल्हा बाहेरील व्यक्ती शहरात येऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात आणत आहे. या प्रकरणी आ.नितेश राणे यांनी येऊन सभा घेतली स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चितावणीखोर भाषणे करून नगर शहरात दोन गटात दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे. नगर शहरातील शांत प्रवृत्तीच्या जनतेला घातक असुन आपला पक्ष व आपण सत्ताधीश असून हुकूमशाही प्रमाणे आम्ही काहीही करू शकतो चितावणीखोर प्रक्षेपक केलेले भाषण सत्तेचा माज किती चढला आहे हे दिसत आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वारंवार नाव घेऊन पोलीस प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. व अहमदनगर महानगरपालिका आयुक्त अनुसूचित जाती वर्गातील उच्चस्पद अधिकारी आहे ते अनुसूचित जातीचे आहेत हे त्यांना माहीत असून मुद्दाम शिवीगाळ करत आरेरावीची भाषा वापरून जाहीर दमबाजी केलेली आहे. त्यामुळे आ. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पोलीस प्रशासनास उर्मट व अरेरावीची भाषा वापरून प्रशासनाचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहे. आ.नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी त्यांना जिल्हा बंदी करावी तसेच जिल्ह्यात धार्मिक सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या कोणत्याही नेत्याला पक्ष व संघटना पदाधिकारी यांना जिल्ह्यात बंदी घालावी या मागणीसाठी 25 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचे अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, आनंद लोखंडे, किरण दाभाडे, नितीन कसबेकर, समीर भिंगारदिवे, सतीश शिरसाट, योगेश साठे, हरीश अल्हाट, अतुल शिंदे, सचिन शेलार आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***चौकट- सुरेश बनसोडे म्हणाले की मोर्चामध्ये शहराच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जाण्या येण्यासाठी गाडीची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून जास्तीत जास्त शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.