दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव मांडवा या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या! आंदोलनाची दखल घेत दहा दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे लेखी आश्वासन !

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे कामासाठी शासनाने 2.5 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. काम 20 टक्के आरसीसी आणि 80 टक्के पेक्षा जास्त भागावर डांबरीकरण करणे अशा स्वरूपात आहे. यापूर्वी देखील संघटनेच्या वतीने रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेत पुन्हा काम सुरू केले परंतु अचानक मागील चार ते पाच महिन्यापासून सदर रस्त्याचे काम अर्ध्यातच पुन्हा बंद केले गेले त्यानंतरही पुन्हा 2 डिसेंबर 2022 रोजी संघटनेच्या वतीने रस्त्याचे काम सुरू करावा अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालयाच्या वतीने या रस्त्याचे कामाची जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत चौकशी सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत काम सुरू करू शकत नाही असे लेखी कळवले होते. आज त्यालाही जवळपास चार महिन्याचा कालावधी उलटलेला असून काही ठराविक लोकांच्या राजकारणा साठी सर्वसामान्य जनतेला अद्याप पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी दळणवळण करण्यासाठी अनेक समस्या येऊन छोटे मोठे अपघात होत आहे. त्यामुळे जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात रस्त्याचे काम त्वरित20 चालू करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन केले असता कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र दिले की येत्या 10 दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनाला यश येऊन आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत दीपक गुगळे, अमित गांधी, शहानवाज शेख, गौतमीताई भिंगारदिवे, विजय मिसाळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.